Ration Card eKYC : 31 डिसेंबरपूर्वी eKYC न केल्यास तुमचे रेशन कार्ड बंद होणार; जाणून घ्या घरबसल्या मोबाईलवरून eKYC करण्याची प्रक्रिया

Ration Card eKYC Update : रेशनकार्ड हा एक आधार कार्ड आणि पॅनकार्ड या प्रमाणे एक महत्वाचा दस्तऐवज असून या रेशन कार्डचे तीन प्रकार आहे, पांढरे, केशरी आणि पिवळे. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारतर्फे मोफत अथवा परवडणाऱ्या किंमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येते. आता रेशन कार्डसंदर्भात भारत सरकारने 31 डिसेंबर पूर्वी रेशन कार्डचे इ-केवायसी (ए) करणे बंधनकारक केले आहे अन्यथा तुमचे रेशन कार्ड कायमस्वरुपी बंद केले जाऊ शकते.

रेशन कार्डची E- KYC करणे का महत्त्वाचे आहे?

eKYC प्रक्रिया भारतातील प्रत्येक रेशन कार्ड धारकाला त्याच्या ओळखपत्राशी जोडण्यासाठी करण्यात येत असून रेशन कार्डचा लाभ हा योग्य योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो आहे का नाही याची खात्री केली जाणार आहे. भारतातील प्रत्येक रेशन कार्ड धारकांनी त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्याची E-KYC करणे आवश्यक आहे. जर त्यांच्या परिवारातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला असेल किंवा एखादे मूल जन्माला आले असेल म्हणजे नवीन सदस्य जोडायचा असेल तर E-KYC च्या मदतीने ती माहिती अपडेट करता येते.

Ration Card eKYC झालेली आहे की नाही, हे कसं तपासणार? (How tot check Ration Card eKYC status)

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधल्या प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे एप्लीकेशन डाऊनलोड करा
  • त्यानंतर एप्लीकेशन चालू करून तुमचा रेशन कार्ड क्रमांक अथवा आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याचा पर्याय दिसेल.
  • त्याठिकाणी आधार किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार सिडिंग या पर्यावरण क्लिक करा
  • आता तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा पर्याय दिसेल.
  • ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला E-KYC करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे No असा पर्याय असेल त्या सदस्याला E-KYC करावी लागेल.
  • E-KYC करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

रेशन दुकानात जाऊन E-KYC करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे.

  • रेशनकार्ड धारकांना ज्या रेशन दुकानामधून धान्य मिळते. त्याच रेशन दुकानात E-KYC करण्याची व्यवस्था आहे.
  • या रेशन दुकानदारांकडे 4G EPOS मशीन आहेत, या मशीनद्वारे ही E-KYC केली जाते.
  • यासाठी रेशन कार्डधारकांनी त्यांचा आधार कार्ड घेऊन जाणे.
  • 4G EPOS या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.
  • यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून E-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
Scroll to Top