Online Voter Id Card 2024 : आजच्या काळात जवळपास प्रत्येक गोष्ट ऑनलाइन उपलब्ध झाल्याने सगळ्याच प्रक्रिया अत्यंत सोप्या झाल्या आहेत. तुम्ही फोन/लॅपटॉपच्या साहाय्याने घरबसल्या अनेक कामे करू शकता. पूर्वी कोणत्याही शासकीय कामासाठी कागदपत्रे कार्यालयात जाऊनच जमा करावी लागायचे. पण सध्याच्या डिजिटल युगात ही प्रक्रिया सोपी झाली आहे. आजच्या या लेखात आपण मतदान ओळखपत्र घरबसल्या कसे बनवायचे याची माहिती जाणून घेणार आहोत.
Online Voter Id Card 2024
घरबसल्या मतदान ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीने बनवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
- सर्वात पहिले इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया Election Commission Of India च्या https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर होम पेजवरील National Voters Services Portal या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर Apply online for registration of new voter या पर्यायावर क्लिक करा.
- आता स्क्रीनवरील फॉर्म व्यवस्थित भरून मागितलेले कागदपत्र अपलोड करा.
- कागदपत्र अपलोड केल्यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा अर्ज सबमिट झाल्यावर, तुमच्या ईमेल आयडीवर प्राप्त झालेल्या ईमेलमध्ये वैयक्तिक मतदार आयडी पेजची लिंक असेल. या लिंकच्या साहाय्याने तुमच्या मतदार ओळखपत्र अर्जाला ट्रॅक करण्यास सक्षम असाल.
सर्व प्रक्रिया व्यवस्थित केल्यावर तुम्हाला तुमच्या मतदार ओळखपत्र एका महिन्यात पोस्टद्वारे पाठविण्यात येईल.
मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराच्या एक पासपोर्ट साइज फोटो
- ओळखीचा पुराव्यासाठी अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र/पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स)पॅन कार्ड किंवा हायस्कूलची मार्कशीट चालेल.
- पत्त्याचा पुराव्यासाठी रेशन कार्ड/तुमचा पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/ युटिलिटी बिल जसे की,फोन किंवा वीजबिल चालेल.
मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी पात्रता::
- अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराकडे कायमस्वरूपी निवासी पत्ता असणे आवश्यक आहे.
जुन्या मतदार ओळखपत्रावरून नवीन ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया:
स्टेप 1: www.nvsp.in येथे अधिकृत राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलला भेट द्या.
स्टेप 2: होमपेजवरील ‘ ई-पीआयसी डाउनलोड ‘ पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 3: तुम्हाला एका नवीन वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करणे आणि तुमच्या निवासस्थानाची स्थिती निवडणे आवश्यक असेल.
स्टेप 4: ‘शोध ‘ बटणावर क्लिक करा .
स्टेप 5: तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP प्राप्त होईल .
स्टेप 6: नियुक्त फील्डमध्ये OTP प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा.
स्टेप 7: ‘ E-PIC डाउनलोड करा ‘ पर्यायावर क्लिक करा आणि ते डाउनलोड करा.