Magel tyala solar pump Yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर पंप योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 9 लाख सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी वीज उपलब्ध करून देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या लेखात आपण या योजनेची संपूर्ण माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, कागदपत्रांची आवश्यकता आणि लाभ कसा मिळवायचा याविषयी सविस्तर चर्चा करू.
काय आहे Magel tyala solar pump Yojana?
‘मागेल त्याला सौर पंप’ अंतर्गत शेतकरी मित्रांना 3, 5 अथवा 7.5 HP क्षमतेचे सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जातात. या योजनेत सौर पंपाची किंमत कमी करून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते:
- सर्वसामान्य शेतकरी: पंपाच्या किंमतीच्या 10% रक्कम भरावी लागते.
- अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी: पंपाच्या किंमतीच्या फक्त 5% रक्कम भरावी लागते.
शेतकऱ्यांना भरावी लागणारी अंदाजे रक्कम:
- 3 HP पंप: ₹17,500 ते ₹18,000
- 5 HP पंप: ₹22,500
- 7.5 HP पंप: ₹27,000
महत्त्वाचे:
सौर कृषी पंपाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी 5 वर्षांसाठी एजन्सीकडे राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पॅनेलचे नुकसान झाल्यास, एजन्सीकडून विमा संरक्षण मिळणार आहे.
योजनेसाठी पात्रतेचे काही निकष आहेत:
1. पाण्याचा स्रोत: विहीर, शेततळे, बोअरवेल असणे गरजेचे आहे.
2. वीजपुरवठ्याचा अभाव: याआधी पारंपरिक कृषी पंपासाठी वीज कनेक्शन नसले पाहिजे.
3. जमिनीचे क्षेत्र:
- 2.5 एकरपर्यंत: 3 HP पंप
- 2.5 ते 5 एकरपर्यंत: 5 HP पंप
- 5 एकराहून अधिक: 7.5 HP पंप
अतिरिक्त पात्रता:
- वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, बारमाही पाणी असलेल्या नदी/नाल्यांच्या जवळील शेतकरी पात्र असतील.
- अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर पंप योजनांचा लाभ घेतलेले शेतकरी योजनेसाठी पात्र नाहीत.
अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
- महावितरणच्या अधिकृत वेबसाईटच्या http://www.mahadiscom.in या लिंकवर क्लिक
- “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” या पर्यायावर क्लिक करा.
- अर्ज भरण्यासाठी तुमच्या वैयक्तिक व जमीन संबंधित माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (सातबारा, आधार कार्ड, बँक पासबुक, इ.).
- सर्व माहिती भरल्यानंतर ‘अर्ज सादर करा’ वर क्लिक करा.
Magel tyala solar pump Yojana साठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी:
- सातबारा उतारा (पाण्याच्या स्रोताची नोंद आवश्यक)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अनुसूचित जाती/जमाती प्रमाणपत्र (असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करण्याची ऑफलाईन प्रक्रिया:
महावितरणच्या जवळच्या कार्यालयात जाऊन अर्ज सादर करू शकता.
अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया
- अर्जदाराला लाभार्थी क्रमांक एसएमएसद्वारे मिळेल.
- वेबसाईटवर अर्जाची सद्यस्थिती तपासा.
- तुम्ही निवडलेल्या एजन्सीकडून शेताची पाहणी केली जाईल.
- पात्र असल्यास सौर पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू होईल.
अडचणी आल्यास मदतीसाठी महावितरणच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करा::
- 1912 / 19120
- 1800-212-3435
- 1800-233-3435
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सिंचनासाठी आवश्यक असलेला विजेचा प्रश्न सोडवावा. योग्य माहिती व अर्ज प्रक्रियेनंतर या योजनेचा लाभ सहजपणे मिळवता येईल.