Lek Ladki Yojana : महाराष्ट्र राज्यात मुलींच्या जन्माला आणि शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना सशक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी योजना (lek ladki yojana) लागू केली असून ही योजना “माझी कन्या भाग्यश्री” योजनेची सुधारीत आवृत्ती आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलींच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाते आणि त्यांचे सक्षमीकरण होते.
लेक लाडकी योजनेचे उद्दिष्टे
लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश मुलींचा सन्मान आणि सक्षमीकरण आहे. या योजनेद्वारे राज्य सरकार पुढील उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करते:
- मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे: मुलींच्या जन्माचा सन्मान वाढवून त्यांचा जन्मदर सुधारावा यासाठी सरकार प्रयत्न करते
- शिक्षणाला चालना: मुलींना शालेय शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदतीचे पाठबळ देणे.
- बालमृत्यूदर कमी करणे: नवजात मुलींच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरवून मृत्यूदर कमी करणे.
- बालविवाह रोखणे: 18 वर्षांपूर्वी मुलींचे विवाह होण्यास आळा घालणे.
- कुपोषण कमी करणे: मुलींच्या पोषण स्थितीचे सुधार करून त्यांना सशक्त बनवणे.
- शाळाबाह्य मुलींची संख्या कमी करणे: मुलींना शाळेच्या मुख्य प्रवाहात ठेवणे व शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे.
Lek Ladki Yojana अंतर्गत मिळणारे लाभ
लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना प्रत्येक टप्प्यावर आर्थिक लाभ दिला जातो. या लाभामुळे त्यांना शालेय शिक्षणापासून वयाच्या 18व्या वर्षांपर्यंत आर्थिक लाभ मिळते:
- मुलीच्या जन्मावेळी: ₹5000
- इयत्ता पहिलीला प्रवेश घेताना: ₹6000
- इयत्ता सहावीला प्रवेश घेताना: ₹7000
- इयत्ता अकरावीला प्रवेश घेताना: ₹8000
- वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यावर: ₹75,000
- एकूण : 1,01,000
योजनेसाठी पात्रता आणि निकष
ही योजना लाभ मिळवण्यासाठी काही अटी व नियमांचे पालन करावे लागते:
- योजना फक्त पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी लागू आहे.
- 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ दिला जातो.
- जुळ्या अपत्यांपैकी एका किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळू शकतो.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- माता-पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
- लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी व तिचे बँक खाते महाराष्ट्रात असावे.
- अंतिम टप्प्याच्या लाभासाठी मुलगी अविवाहित असावी.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. मुलीचा जन्म दाखला
2. कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3. लाभार्थीचे आणि पालकांचे आधार कार्ड
4. रेशनकार्ड (पिवळे किंवा केशरी)
5. बँक खात्याचे तपशील (पासबुकची प्रत)
6. मतदान ओळखपत्र
7. शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र
8. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
9. अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे प्रमाणपत्र
योजनेच्या महत्वाचे वैशिष्ठ्ये खालीलप्रमाणे
1. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यास प्रोत्साहन: आर्थिक प्रोत्साहनामुळे मुलगी जन्माला आल्यावर आनंद साजरा करण्यास कुटुंबे प्रेरित होतील.
2. मुलींच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ: गरीब कुटुंबातील मुली शिक्षण घेत राहाव्यात यासाठी मदतीचा हात दिला जातो.
3. मुलींच्या सक्षमीकरणाचा मार्ग: मुलगी स्वावलंबी व सक्षम व्हावी, यासाठी तिच्या प्रत्येक टप्प्यावर आधार दिला जातो.
4. कुटुंब नियोजनावर भर: पालकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून दिले जाते.
योजनेच्या अंमलबजावणीचा प्रभाव
लेक लाडकी योजना फक्त आर्थिक मदतपुरती मर्यादित नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी माध्यम आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे…
- मुलींच्या जन्माचा सन्मान वाढेल.
- मुली शिक्षण घेत राहतील आणि बालविवाह थांबेल.
- कुपोषण आणि मुलींचा मृत्यूदर कमी होईल.
तुम्ही योजनेचा लाभ कसा घेऊ शकता?
- तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात योजनेबद्दल माहिती मिळवा.
- आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करा.
- अर्जाचे मूल्यांकन होऊन, मान्यता मिळाल्यावर लाभाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
संदेश
“लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) राज्यातील मुलींच्याना आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आपल्या मुलींसाठी या योजनेचा लाभ जरूर घ्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्या.”