Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्त्याबाबतची महत्त्वाची घोषणा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाला चालना देणारी योजना
या योजनेसंदर्भात माहिती देताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने लाडकी बहीण योजना मोठं पाऊल आहे. 26 जानेवारीच्या आधीच हफ्ता मिळेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी 3,690 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.”
लाडक्या बहिणींनो स्वत:हून लाभ सोडा! सरकारचं आवाहन, अन्यथा कारवाई होणार
योजनेचा पुढील टप्पा फेब्रुवारीसाठी नियोजित आहे. आदिती तटकरे म्हणाल्या की, “2 कोटी 46 लाख महिलांना योजनेचा लाभ दिला जात आहे. यामध्ये काही ड्युप्लिकेशनच्या केसेस आढळल्या असल्या तरी त्या फारशा प्रभावी नाहीत.”
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याचे निकष:
- वय: 21 ते 60 वर्षांदरम्यान.
- महिन्याला आर्थिक मदत: रु. 1500 प्रति महिना.
- वार्षिक तरतूद: शासनाकडून दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार.
- अंमलबजावणीची तारीख: योजना जुलै 2024 पासून सुरू झाली.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष:
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकषांचे पालन करावे लागेल:
- लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- महिलांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
या महिला पात्र नाही?
या योजनेसाठी खालील महिला पात्र ठरणार नाहीत:
- ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
- घरातील कुणी इनकम टॅक्स भरत असल्यास.
- कुटुंबातील कुणी शासकीय नोकरी करत असेल किंवा निवृत्तीवेतन घेत असेल.
- कुटुंबाकडे 5 एकरांपेक्षा जास्त जमीन असल्यास.
- कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास.
लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची गरज भासेल:
- आधारकार्ड.
- रेशनकार्ड.
- उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी दाखला.
- बँक पासबुकची प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया:
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने पोर्टल, मोबाइल ॲप किंवा सेतू सुविधा केंद्र येथे भरता येतील.
- ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे कठीण जाईल, त्यांना अंगणवाडी केंद्रामध्ये अर्ज करण्यासाठी मदत मिळणार आहे.
जानेवारी महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार?
जानेवारी महिन्याचा ₹1500 चा हफ्ता प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी 2025 या दिवशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
महिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी ही योजना एक मोठे पाऊल ठरत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला वेळेत अर्ज करून लाभ मिळवू शकतात