राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana सुरुवात केली असून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्यामध्येच नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे दिले आहेत. आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न पडला असून यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
डिसेंबर महिन्याचे पैसे नेमके येणार तरी केव्हा?
2 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे अडकु नयेत म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबर महिन्यातच दिले आहेत.
आता राज्यात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार असून 23 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आणि या निकाल लागल्यानंतर आम्ही राज्यातील पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा नोव्हेंबर महिन्यातच देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
- ई-केवायसी करण्यासाठी, बँकेत जाऊन खालील प्रक्रिया करावी लागते:
- बँकेत जाताना आधार कार्ड आणि मोबाइल घेऊन जावे.
- बँकेत गेल्यानंतर, खातेदाराला आपला आधार नंबर अपलोड करावा लागतो.
- आधार कार्ड नंबर अपलोड करताना आधार कार्डची झेरॉक्स आणि ग्राहकाचे थम्ब देखील घेतले जातात.
- त्यानंतर ग्राहकाच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येतो.
- हा ओटीपी दिल्यानंतर ग्राहकाची केवायसी पूर्ण होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत नवीन खाते उघडण्याची गरज नाही आणि बँक खात्यात डिपॉझिटही करण्याची गरज नाही. तुमच्या बँकेच्या सध्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे