Farmer ID card status Chake : शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध कृषी योजनांचा थेट आणि पारदर्शी लाभ मिळावा म्हणून फार्मर आयडी (Farmer ID) लागू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला 11 अंकी एक खास ओळख क्रमांक दिला जाणार आहे.
हा ओळख क्रमांक आधार आणि पॅन कार्डप्रमाणेच शेतकऱ्यांची अधिकृत ओळख ठरणार आहे. यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि मध्यस्थांची भूमिका संपुष्टात येईल.
जर तुम्ही अजून शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल, तर खालील प्रक्रिया फॉलो करून सहज अर्ज करू शकता.
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id) साठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
पात्रता:
- अर्जदार भारतीय नागरिक असावा
- अर्जदार शेतकरी असावा आणि त्याच्याकडे शेतीचा अधिकृत पुरावा असावा
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक
Farmer id साठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- सातबारा उतारा (7/12) किंवा जमीन मालकीचा पुरावा
- बँक पासबुकची झेरॉक्स
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल नंबर (OTP साठी)
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer id) साठी अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया खालीलप्रमाणे
- सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/ ला भेट द्या
- त्यानंतर “New Register” अथवा “नवीन नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा
- आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे व्हेरिफाय करा
- तुमची संपूर्ण व्यक्तिगत आणि शेतीची माहिती भरा जसे की
- संपूर्ण नाव (आधार कार्डवर असल्याप्रमाणे)
- तुमचा पत्ता आणि तुमच्या गावाचे नाव
- तुमच्या बँक खात्याचे सर्व तपशील जसे की तुमच्या बँक नाव, त्या बँकेचे IFSC कोड आणि तुमचे खाते क्रमांक
- शेतीची माहिती (जमिनीचा प्रकार, एकूण क्षेत्रफळ, पिकांचे प्रकार)
- त्यानंतर तुम्हाला मागितलेले आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती नीट तपासून “Submit” या पर्यायावर क्लिक करा
नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक अर्थातच एक Enrollment ID मिळेल. हा नंबर सेव करून ठेवा, कारण याच नंबरच्या सहाय्याने तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासता येईल.
शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID card status Chake) ची स्थिती कशी तपासायची?
जर तुम्हाला तुमच्या Farmer id च्या अर्जाची स्थिती तपासायची असेल, तर खालील प्रक्रिया वापरा.
- यासाठी संबंधित व अधिकृत वेबसाइट https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus ला भेट द्या.
- त्यानंतर Enrollment ID किंवा Aadhaar क्रमांक टाका.
- त्यानंतर “Check” बटणावर क्लिक करा
- तुमच्या अर्जाची सद्यस्थिती स्क्रीनवर दिसेल
- “Pending” असेल तर अर्ज अद्याप प्रक्रियेत आहे
- “Approved“असेल तर तुम्हाला तुमचा 11 अंकी फार्मर आयडी क्रमांक दिसेल
Farmer id Numbar चे फायदे
- शासकीय योजनांचा लाभ थेट खात्यात जमा होईल
- PM किसान योजनेसाठी KYC करण्याची गरज कमी होईल
- वारंवार आधार आणि बँक तपशील अपडेट करण्याची गरज नाही
- शेतीसाठी कर्ज घेणे सोपे होईल
- पीक विमा योजना आणि खत व बियाणे अनुदान मिळवणे सुलभ होईल
- सरकारी मदतीसाठी दलालांची भूमिका संपुष्टात येईल
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना
- जर तुम्ही अजून फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नसेल, तर त्वरित अर्ज करा
- नोंदणी करताना दिलेली माहिती अचूक द्या, अन्यथा अर्ज बाद होऊ शकतो
- अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर SMS किंवा ईमेलद्वारे माहिती दिली जाईल
शेतकरी बांधवांनी ही माहिती इतरांसोबतही शेअर करावी, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येईल.