मतदान ओळखपत्र हरवलंय? चिंता नको, घरबसल्या मोबाईलवर वोटर कार्ड डाऊनलोड करा : How To Download Voter ID Card Online

How To Download Voter ID Card Online : जेव्हा भारतातील कोणताही नागरिक 18 वर्षांचा होतो तेव्हा तो मतदान करण्यासाठी पात्र ठरतात. आपल्या भारत देशात मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र असणे अत्यंत आवश्यक असते. अशा वेळेस 18 वर्ष किंवा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे कोणतेही भारतीय नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करून Voter ID मिळवू शकतात, शिवाय त्या Voter ID वापर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ओळख पुराव्याचा दस्तऐवज म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो.

महाराष्ट्रात 2024 मध्ये विधान निवडणुकीचा बिगुल वाजला असून, मतदार ओळखपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे, कारण की जेव्हा मतदाराकडे प्रत्यक्ष मतदार ओळखपत्र नसते. ते मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्राची डाउनलोड केलेली प्रत दाखवून मतदान करू शकतात.

आजच्या या लेखात आपण मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करूनते कसे डाउनलोड करावे याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

What is a Voter ID card?

मतदार आयडी हे भारताच्या निवडणूक आयोगाने जारी केलेले एक महत्त्वाचे ओळखपत्र असून मतदार ओळखपत्राचे मूळ कार्य म्हणजे मतदारांच्या ओळखीचा पुरावा बनून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आणि मुक्त आणि निष्पक्ष लोकशाही निवडणुकीदरम्यान फसवणूकीला प्रतिबंध करणे. मतदार ओळखपत्राला EPIC (Electors Photo Identity Card) निवडणूक ओळखपत्र किंवा मतदार ओळखपत्र असे सुद्धा म्हणतात.

Voter ID Download with Photo

जानेवारी 2021 मध्ये केंद्र सरकारने e-EPIC लाँच केले. e-EPIC ही इलेक्टर्स फोटो आयडेंटिटी कार्डची (EPIC) इलेक्ट्रॉनिक आवृत्ती असून आपण e-EPIC कार्ड किंवा मतदार ओळखपत्र ऑनलाइन पीडीएफमध्ये डाउनलोड करू शकतात, आणि नंतर Digi लॉकरवर अपलोड करता येऊ शकतात अथवा प्रिंट काढून लॅमिनेटेड करून वापरले जाऊ शकतात.

कृपया लक्षात घ्या की e-EPIC कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर अपडेट करणे आवश्यक आहे. तुम्ही फॉर्म-8 भरून तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. मतदार आयडी सोबत तुमचा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा:

  • सर्वात पहिले अधिकृत मतदार सेवाच्या https://voters.eci.gov.in/ या पोर्टलला भेट द्या.
  • त्यानंतर ‘लॉग इन’ वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ‘OTP’ पर्यायावर क्लिक करा. 
  • आता तुमच्या मोबाईलवर आलेला OTP एंटर करून ‘Verify & Login’ पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर ‘Shifting of residence/correction of entries in existing electoral roll/replacement of EPIC/marking of PwD’ या टॅबखाली ‘Fill Form 8’ या पर्यायावर क्लिक करा.
  • आता, ‘Self’ पर्याय नवडून ‘Submit’ पर्यायावर क्लिक करा.
  • तुमच्या मतदार ओळखपत्राचे तपशील प्रदर्शित केले जातील. ‘ओके’ बटणावर क्लिक करा. पुढे, ‘‘Correction of Entries in Existing Electoral Roll’’ हा पर्याय नवदून ‘ओके’ पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर तुमचे राज्य, जिल्हा आणि विधानसभा/संसदीय मतदारसंघ निवडा आणि ‘Next’ पर्यायावर क्लिक करा.
  • आता ‘तपशील’ विभागांतर्गत, मोबाइल नंबर पर्यायाखाली ‘सेल्फ’ निवडा, तुमचा मोबाइल नंबर प्रविष्ट करून ‘Next’ पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘विद्यमान मतदार यादीतील नोंदी सुधारण्यासाठी अर्ज’ विभागाअंतर्गत ‘मोबाइल नंबर’ निवडा. मोबाइल नंबर, ओटीपी टाका आणि ‘पुढील’ वर क्लिक करा.
  • आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘Preview and Submit’ या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला तिन्ही भरलेली माहिती दिसेल.
  • आता ‘सबमिट’ पर्यायावर क्लिक केल्यास मोबाईल नंबर लगेच अपडेट होईल.

Steps To Download the digital Voter ID or e-EPIC card

  • स्टेप 1: अधिकृत मतदार सेवा पोर्टलला भेट द्या.
  • स्टेप 2: ‘लॉगिन’ वर क्लिक करून मोबाईल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि ‘OTP’ बटणावर क्लिक करा.
  • स्टेप 3: तुमच्या मोबाइल फोनवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि ‘Verify & Login’ बटणावर क्लिक करा.
  • स्टेप 4: ‘E-EPIC Download’ टॅबवर क्लिक करा.
  • स्टेप 5: ‘EPIC क्रमांक’ किंवा ‘फॉर्म संदर्भ क्रमांक’ पर्याय निवडा.
  • स्टेप 6: EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक प्रविष्ट करा, राज्य निवडा आणि ‘शोध’ वर क्लिक करा.

    EPIC क्रमांक हा मतदार ओळखपत्र क्रमांक आहे. फॉर्म 6 सबमिट केल्यानंतर प्राप्त झालेल्या पावतीमध्ये संदर्भ क्रमांक उपलब्ध आहे.
  • स्टेप 7: मतदार आयडी तपशील स्क्रीनवर प्रदर्शित होईल. ‘ओटीपी पाठवा’ बटणावर क्लिक करा. कृपया लक्षात घ्या की तुमचा मोबाइल नंबर अपडेट न केल्यास, ‘ओटीपी पाठवा’ बटण उपलब्ध होणार नाही.
  • स्टेप 8: OTP एंटर करा आणि ‘Verify’ वर क्लिक करा.
  • स्टेप 9: मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी ‘डाऊनलोड e-EPIC’ बटणावर क्लिक करा.

मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी पर्यायी पद्धती

मतदार सेवा पोर्टलद्वारे व्यक्ती डिजिटल मतदार ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. ई-ईपीआयसी कार्ड्स किंवा डिजिटल व्होटर आयडी कार्ड डाउनलोड करण्याची पर्यायी पद्धत व्होटर हेल्पलाइन मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा होऊ शकते.

How to download Voter ID in the Voter Helpline app?

  • स्टेप 1: Google Play Store किंवा Apple Store वरून मतदार हेल्पलाइन ॲप डाउनलोड करा.
  • स्टेप 2: ‘पर्सनल व्हॉल्ट’ पर्यायावर क्लिक करा.
  • स्टेप 3: ‘लॉग इन’ वर क्लिक करा.
  • स्टेप 4: तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड आणि OTP एंटर करा आणि ‘लॉग इन’ वर क्लिक करा.
  • स्टेप 5: तुमचे e-EPIC कार्ड तपशील स्क्रीनवर प्रदर्शित केले जातील. ‘डाउनलोड’ बटणावर क्लिक करा.
  • E-EPIC कार्ड तुमच्या मोबाईल फोनवर डाउनलोड केले जाईल.
Scroll to Top