Ration Card EKyc 2024 : सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 31 डिसेंबरपर्यंत KYC न केल्यास तुम्हाला रेशन दुकानांवर मोफत किंवा स्वस्त दरातील धान्य मिळणं बंद होईल.
Ration Card E-Kyc झाली आहे की नाही, हे या प्रकारे तपासा
- मेरा राशन ॲप डाऊनलोड करा: सर्वांत अगोदर Google Play Store वर जाऊन Mera Ration ॲप डाऊनलोड करा.
- ॲप मध्ये माहिती भरा: ॲप उघडल्यावर तुम्हाला शिधापत्रिका क्रमांक/आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल. तुमच्या सोयीनुसार कोणताही एक पर्याय निवडा.
- आधार सिडिंग तपासा: माहिती सबमिट केल्यानंतर आधार सिडिंग पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे Yes किंवा No असे ऑप्शन दिसतील.
Yes : चा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण आहे.
No : चा अर्थ त्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.
अशी करा Ration Card ची E-Kyc
- सर्वप्रथम तुम्ही रेशनकार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जा.
- रेशन दुकानात पोहोचल्यानंतर तिथला दुकानदार तुमचा अंगठा POS मशीनवर ठेवेल आणि तुमची ओळख सत्यापित करेल.
- मशीनवर तुमचा अंगठा यशस्वीरित्या स्कॅन झाल्यावर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
मोबाईलवर अशी करा रेशन कार्डची e-kyc?
ज्या सदस्याची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्याची E-KYC करण्यासाठी खालीलप्रमाणे पद्धत वापरा
- राज्य खाद्य पुरवठा विभागाच्या वेबसाइट https://rcms.mahafood.gov.in/ ला भेट द्या
- ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- तिथे तुमच्या शिधापत्रिका क्रमांकासह संबंधित सदस्याचा आधार क्रमांक जोडावा लागेल.
- माहितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेची ई-केवायसी अपडेट होईल आणि तुम्हाला लाभ मिळणे चालू राहील.