Ladka Shetkari Yojana – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार असून, या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी ६ हजार रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजेच, केंद्राच्या ६ हजार रुपयांबरोबरच राज्य सरकारचे ६ हजार मिळून, शेतकऱ्याला दरवर्षी एकूण १२ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
फडणवीस यांनी २००६ ते २०१३ या कालावधीत विदर्भातील अनेक शेतकऱ्यांची जमीन थेट खरेदीच्या नावाखाली कमी मोबदल्यात घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले, त्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक झाली. मी मुख्यमंत्री असताना थेट खरेदीला जमिनीच्या किमतीच्या पाचपट मोबदला द्यावा, असा शासन निर्णय घेतला होता. मात्र, सरकार बदलल्यानंतर हे नियम पाळले गेले नाहीत. आता हे अन्यायग्रस्त शेतकरी पुन्हा न्याय मिळवतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर फडणवीस यांनी राज्यातील अनेक विकास योजनांची माहिती दिली, ज्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- बळीराजा जलसंजीवनी योजनेतील विविध प्रकल्पांना मंजुरी
- वैनगंगा-नलगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण करून ७ जिल्ह्यांना दुष्काळमुक्त करणे
- दिवसा १२ तास वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे
- २ लाख रोजगार निर्मितीचे टेक्सटाईल पार्क
- कापूस उत्पादकांसाठी क्लस्टर प्रकल्प
- ६ हजार कोटींची नानाजी देशमुख योजना – दुसरी फेरी
फडणवीस यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी नवीन कायदे आणले जात आहेत. मृद व जलसंधारण विभागाच्या जमिनीच्या खरेदीबाबत नवीन जीआर लवकरच लागू केला जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ स्थापन केले जाईल आणि त्यांच्यासाठी कर्ज योजनाही राबवली जाईल.
तसेच, ड्रोन व सॅटेलाईटच्या मदतीने जमिनीचे डिजिटायझेशन केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची मालमत्ता अधिक सुरक्षित व पारदर्शक पद्धतीने नोंदवता येईल.
शेवटी, समृद्धी महामार्गाच्या महत्त्वावर भर देत फडणवीस म्हणाले की, शेतीमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर बनवणे हेच सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
At post khedibhokari ta chopda jist jalgaon 425107
At Post khedibhokari ta chopda jist jalgaon 425107
at Post khedibhokari ta chopda jist jalgaon
Hi this is shaikh muneer
Tajammul patel