रेशन कार्ड e-KYC करण्याची अंतिम तारीख जाहीर! लगेच KYC करा नाही केली तर रेशन बंद! – Ration Card e-KYC 2025

Ration Card e-KYC 2025 – रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे, रेशन कार्ड e-KYC करणे अनिवार्य करण्यात आले असून, जर तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत e-KYC पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड कायमचे बंद होऊन शासनाच्या इतर योजनांपासून सुद्धा तुम्हाला मुकावे लागेल.

तुमच्या रेशन कार्डची e-KYC पूर्ण झाली आहे का? जर नाही, तर ऑनलाइन फ्री KYC करण्याची प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा जाणून घ्या.

Ration Card e-KYC करणे का आवश्यक आहे?

रेशन प्रणालीत मोठ्या प्रमाणावर अपात्र लोकांचा समावेश झाल्यामुळे सरकारने आधार-आधारित e-KYC करण्याची सक्ती केली आहे. यामुळे फक्त पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच मोफत किंवा अनुदानावर रेशन मिळेल. 

याशिवाय, e-KYC केल्याने लाभार्थ्यांना डिजिटल रेशन कार्ड सुद्धा मिळेल आणि ते Online Ration Status Check करू शकतील.

Ration Card e-KYC करण्याची अंतिम तारीख

सरकारने यापूर्वी e-KYC करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 ही अंतिम तारीख जाहीर केली होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ती वाढवून 31 मार्च 2025 करण्यात आली आहे. तरीही, 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे सरकारचे आवाहन आहे. जर तुम्ही दिलेल्या वेळेत e-KYC केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड अमान्य ठरू शकते आणि नाव योजनेतून काढले जाऊ शकते.

घरबसल्या मोबाईलवर Ration Card e-KYC करण्याची सोपी आणि step by step प्रक्रिया

यापूर्वी लाभार्थ्यांना रेशन दुकानात जाऊन KYC करावी लागत होती, पण आता ही प्रक्रिया तुमच्या हातातल्या मोबाईलवरून घरबसल्या करता येते. 

Ration Card e-KYC करण्यासाठी आवश्यक असलेले दोन अ‍ॅप्स

तुमच्या मोबाईलमध्ये खालील 2 अ‍ॅप्स डाउनलोड करणे गरजेचे आहे:

  1. Mera E-KYC Mobile App – इथून डाउनलोड करा
  2. Aadhaar Face RD Service App – इथून डाउनलोड करा

Step-by-Step मार्गदर्शन — Ration Card e-KYC कसे करावे?

  1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये वरील अ‍ॅप्स इन्स्टॉल करा 
    • वरील Mera E-KYC App आणि Aadhaar Face RD Service App डाउनलोड करून आवश्यक परवानग्या द्या.
  2. Mera E-KYC अ‍ॅप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा
    • राज्य निवडा – महाराष्ट्र
    • आधार क्रमांक टाका आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.
    • कॅप्चरर कोड प्रविष्ट करा.
  3. चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)
    • समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.
    • स्क्रीनवरील सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.
    • जर दुसऱ्या व्यक्तीची KYC करत असाल, तर बॅक कॅमेरा वापरा.
  4. सत्यापन पूर्ण करा
    • यशस्वी पडताळणी झाल्यास रेशन दुकानाच्या e-POS मशीनवर तुमची माहिती अपडेट होईल.
    • खात्री करण्यासाठी तुम्ही “E-KYC Status” चेक करा.
    • जर “E-KYC Status – Y” दिसत असेल, तर समजा तुमची e-KYC ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Ration Card e-KYC संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे

  • ही सुविधा सध्या फक्त महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी उपलब्ध आहे.
  • महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांनी IMPDS KYC पर्यायाचा वापर करावा.
  • e-KYC करण्यासाठी आधार कार्ड मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • रेशन दुकानदारांनी देखील लाभार्थ्यांना सहकार्य करून ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.

Ration Card होण्यापासून वाचण्यासाठी त्वरित e-KYC करा

जर तुम्ही e-KYC अद्याप पूर्ण केली नसेल, तर लवकरात लवकर ती पूर्ण करा. सरकारने 31 मार्च 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. वेळेत e-KYC न केल्यास, तुमचे रेशन बंद होईल आणि शिधापत्रिकेवरून नाव काढले जाऊ शकते.

तातडीने KYC करा आणि तुमच्या कुटुंबाचा रेशन मिळण्याचा हक्क वाचवा.

Scroll to Top