Traffic Police Challan challenge : जर तुम्हाला चुकीचे वाहतूक चलन (Traffic Challan) आले असेल आणि तुम्ही कोणतेही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले नाही, आणि तरीही दंड भरावा लागत असेल, तर घाबरू नका! न्यायालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने सदरील पावती रद्द करता येते अथवा जर तुम्ही दंड भरलेला असेल तर तो सुध्दा परत मिळवता येतो. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याविषयीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणार आहोत.
वाहतूक चलन चुकीचे येण्यामागची कारणे
सध्या वाहतूक नियम डिजिटल यंत्रणेद्वारे अंमलात आणले जात आहेत. त्यामुळे अनेकदा चुकीची चलने निर्माण होतात.
- वाहतूक शाखेच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये चुकीचा नंबर वाचला जातो आणि चुकीच्या गाडीला दंड ठोठावला जातो.
- एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने तुमच्या वाहनाचा नंबर दिला असेल.
- वाहतूक पोलिसांच्या यंत्रणेत काही तांत्रिक गडबड झाल्याने चुकीचे चलन निघते.
साधारणपणे ऑनलाइन वाहतूक चलनाचा दंड 500 रुपये ते 4000 रुपये इतक्या रकमेसाठी असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. मात्र तुम्ही घाबरू नका, तूम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सुद्धा सहज तक्रार करून चुकीचे चलन रद्द करू शकता.
ऑनलाईन वाहतूक चलन कसे रद्द करावे? (Traffic Challan Dispute Online Process)
पद्धत क्रमांक 1: वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन तक्रार नोंदवा ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे
- सर्वप्रथम रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या morth.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- तिथे Grievance (तक्रार नोंदणी) पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर त्याठिकाणी तुमचे पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, गाडीचा क्रमांक आणि चलन क्रमांक नमूद करा.
- तुमची तक्रार स्पष्ट आणि सोप्या शब्दात लिहा आणि योग्य पुरावे जसे की सदरील वाहन हे तुमच्या मालकीचे नाही अथवा त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी नव्हता असे अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर तुमच्या तक्रारीवर चौकशी केली जाईल आणि चुकीचे चलन असल्यास ते रद्द केले जाईल.
पद्धत क्रमांक 2 : महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी खास सुविधा
जर तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असाल, तर महाराष्ट्र राज्याच्या वाहतूक विभागाच्या संकेतस्थळावरून थेट तक्रार करू शकता.
➡️ वाहतूक चलन तक्रार करण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️
वर क्लिक करून तुमचा चलन क्रमांक आणि तक्रार दाखल करा, त्यानंतर वाहतूक विभाग तुमच्या तक्रारीची तपासणी करून योग्य कारवाई करेल.
ऑफलाईन पद्धतीने वाहतूक चलन कसे रद्द करावे? (Offline Process)
पण जर का तुम्हाला वरील ऑनलाइन प्रक्रिया अवघड आणि किचकट वाटत असेल, तर तुम्ही थेट वाहतूक पोलीस शाखेत जाऊन सुद्धा तक्रार करू शकता.
तुम्ही काय करावे?
- तुमच्या जवळच्या वाहतूक पोलीस शाखेत जा.
- तुम्हाला चुकीचे चलन आले आहे हे स्पष्ट करणारे सबळ पुरावे द्या जसे की, गाडी त्या वेळी वेगळ्या ठिकाणी होती, नंबर चुकीचा आहे..!
- वाहतूक पोलिसांकडे चलन रद्द करण्याची विनंती करा.
- जर पोलीस कोर्टात जाण्यास सांगत असतील, तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि ऑनलाइन प्रक्रियेचा आग्रह धरा.
भरलेला दंड परत कसा मिळवावा? (Refund Process for Wrong Challan)
जर तुम्ही दंड भरून टाकला असेल आणि नंतर लक्षात आले की चलन चुकीचे आहे, तर तुम्ही दंडाचा परतावा मागू शकता, त्यासाठी…
- सर्वात प्रथम morth.nic.in या वेबसाईटवर किंवा राज्य वाहतूक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करा.
- योग्य पुरावे सादर केल्यानंतर तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल
- तुमची तक्रार खरी असल्यास तुम्हाला भरलेला दंड बँक खात्यात परत मिळेल.
काही इतर महत्त्वाच्या गोष्टी:
- वाहन चालताना तुमच्याकडे नेहमी गाडीच्या आरसी बुक, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्स असे महत्वाचे कागदपत्र असावे.
- कोणत्याही प्रकारचे चुकीचे चलन असल्यास, कोणतीही विलंब न करता लगेच तक्रार नोंदवावी.
- कोणत्याही तडजोडीच्या ऑफरला बळी पडून स्वतःची नुकसान न करून घेता योग्य प्रक्रियेतून काम करा.
निष्कर्ष :
जर तुम्हाला चुकीने वाहतूक चलन आले असेल, तर घाबरू न जाता घाईगडबडीत कोणताही दंड भरू नका. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या दोन्ही पद्धतीने तुम्ही सहज आणि घरबसल्या तक्रार करून दंड टाळू शकता. तसेच, भरलेला दंड योग्य पुराव्यांसह परत मिळवू शकता.
असे माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी नेहमी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा