Free invitation cards making in Marathi या सुविधेमुळे तुमच्या विविध कौटुंबिक आणि धार्मिक सोहळ्यांसाठी डिजिटल निमंत्रण पत्रिका अगदी मोफत तयार करता येतात. भारतातील संस्कृतीने भरलेल्या वातावरणात, प्रत्येक घरगुती कार्यक्रमात पाहुण्यांना निमंत्रित करण्यासाठी सुंदर निमंत्रण पत्रिका बनवणे आवश्यक असते. परंतु बाहेर डिझायनरकडे जाऊन पत्रिका तयार करताना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते.
सुदैवाने, आता अनेक अशा Free invitation cards making in Marathi ॲप्स आणि वेबसाइट्स उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही अगदी मोफत निमंत्रण पत्रिका तयार करू शकता. या लेखात आपण काही महत्त्वाच्या ॲप्स आणि वेबसाइट्सबद्दल जाणून घेणार आहोत.
कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या निमंत्रणपत्रिका
वर्षभरात आपण विविध कौटुंबिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करतो. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या निमंत्रण पत्रिकांची गरज लागते.
उदाहरणार्थ:
- लग्नपत्रिका
- साखरपुडा निमंत्रण
- हळदीचे निमंत्रण
- वास्तुशांती निमंत्रण
- गृहप्रवेश निमंत्रण
- नामकरण विधी
- सत्यनारायण पूजा
- जावळ विधी
- मुंज निमंत्रण
- डोहाळे जेवण निमंत्रण
डिजिटल निमंत्रण पत्रिकांचा जमाना
कागदी निमंत्रण पत्रिकांना टाळत, पर्यावरणपूरक डिजिटल निमंत्रण पत्रिका सध्या जास्त वापरल्या जातात. यामुळे खर्च कमी होतो, वेळ वाचतो, आणि व्हॉट्सॲप, ईमेल किंवा टेलिग्रामद्वारे सहजपणे निमंत्रण पाठवता येते.
मोफत मराठी निमंत्रण पत्रिका तयार करणारे प्लॅटफॉर्म
1. Canva
https://www.canva.com/ किंवा ॲपवर तुम्ही विविध कार्यक्रमांसाठी मोफत आणि आकर्षक निमंत्रण पत्रिका तयार करू शकता. काही फॉर्मॅट्स मोफत असतात तर काहींसाठी पैसे भरावे लागतात. तुम्ही फ्री टेम्पलेट्स निवडून त्यात तुमची माहिती भरून सहजपणे पत्रिका बनवू शकता.
2. मराठी इन्विटेशन कार्ड्स
https://play.google.com/store/apps/details?id=com.urva.allinvitationcards मध्ये लग्न, जावळ, सत्यनारायण पूजा यांसारख्या कार्यक्रमांसाठी खास मराठी निमंत्रण पत्रिकांचे टेम्पलेट्स उपलब्ध आहेत. हे टेम्पलेट्स एडिट करून तुमच्या सोहळ्याची माहिती भरून पत्रिका तयार करता येते.
3. Greetings Island
https://www.greetingsisland.com/ ही एक इंग्रजी वेबसाइट आहे जिथे तुम्ही साखरपुडा, रिसेप्शन, लग्न यांसारख्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण पत्रिका बनवू शकता. फ्री आणि प्रीमियम डिझाईन्सच्या माध्यमातून तुम्हाला हवी तशी पत्रिका तयार करता येते.
4. Paperless Post
https://www.paperlesspost.com/ देखील मोफत डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी उपयुक्त आहे. या प्लॅटफॉर्मवर खास डिझाईन्स फ्रीमध्ये उपलब्ध आहेत, तर काही प्रीमियम डिझाईन्ससाठी पैसे भरावे लागतात.
निष्कर्ष
याच प्रकारे आपण Free invitation cards making सुविधेमुळे घरबसल्या तुमच्या मोबाईलवर डिजिटल निमंत्रण पत्रिका बनवू शकता. या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून पैसे वाचवा आणि पर्यावरणपूरक निमंत्रण पत्रिकांचा वापर करा. तुमच्या मित्र-परिवाराला देखील ही माहिती शेअर करा आणि त्यांनाही याचा लाभ घेण्यास प्रवृत्त करा.
Making Free invitation cards सोबत इतर उपयुक्त लेखांसाठी आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या! धन्यवाद..!