Old Land Records free Download : शेत जमिनीशी संबंधित असलेली जुनी कागदपत्रे, जसे की सातबारे (Satbara) उतारे, फेरफार नक्कल, आणि खाते उतारे आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध झालेले आहेत. जुने कागदपत्रे खराब होऊन नुकसान किंवा गहाळ होण्याचा धोका ओळखून महाराष्ट्र शासनाने ही सर्व कागदपत्रे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे तुम्हाला आता शेत जमिनी संबंधित कोणत्याही कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयाच्या खेट्या मारण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घरबसल्या, तुमच्या मोबाईलवर सहजपणे ही कागदपत्रे पाहता येतील. खालील सोपी आणि सविस्तर प्रक्रिया यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करेल.
जुनी कागदपत्रे डाऊनलोड करण्याची प्रक्रिया (Old Land Records free Download)
- सर्वप्रथम आपले भूलेख पोर्टलच्या
https//aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords या संकेतस्थळाला भेट द्या. (सदरील संकेतस्थळ हे मोबाईल आणि कॉम्प्युटर या दोन्हीवर सहज वापरता येते.) - नोंदणी/लॉगिन करा
- जर या संकेतस्थळावर तुमचे खाते आधीपासून तयार असेल, तर लॉगिन या पर्यायावर क्लिक करा.
- जर खाते बनवलेले नसल्यास नसल्यास, “नवीन नोंदणी ” या पर्यायावर क्लिक करा.
- नोंदणीसाठी आवश्यक तपशील भरा
- तुमचे नाव अधिकृत आणि योग्य ते नाव नोंदवा.
- तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी हे तुमच्या खात्याची खात्री करण्यासाठी आवश्यक आहे.
- यानंतर जन्मतारीख आणि तुमचा पत्याचा योग्य तपशील भरा.
यानंतर तुमचे पिन कोड, तालुका, आणि जिल्हा कोणता याची अचूक माहिती द्या - त्यानंतर, तुमचे पासवर्ड तयार करा आणि सबमिट करा. यामुळे तुमची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.
- तुमचे नाव अधिकृत आणि योग्य ते नाव नोंदवा.
- आता लॉगिन करा
- नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या User ID आणि पासवर्डचा वापर करून पोर्टलवर लॉगिन करा.
- रेगुलर सर्च करा
- लॉगिन केल्यानंतर, मुख्य पृष्ठावर तुम्हाला “Regular Search” हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
आता तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल, त्यामध्ये खालील माहिती भरावी लागेल
- कार्यालय ज्या जिल्ह्याच्या कार्यालयात तुमची जमीन येते, ते निवडा.
- जिल्हा, तालुका, आणि गाव तुमच्या जमिनीशी संबंधित भाग निवडा.
- दस्ताऐवजाचा प्रकार निवडा जसे की, सातबारा (satbara) उतारा, फेरफार नक्कल, किंवा खाते उतारा यापैकी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची गरज आहे ते निवडा.
- सर्वे नंबर टाका आणि सर्च करा : तुमच्या जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट क्रमांक टाका. त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा.
कागदपत्रे पाहा आणि तपासा :
- सर्चची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला हवे असलेले कागदपत्र तुमच्या मोबाईल/कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसेल.
- शिवाय इतर कागदपत्रांची यादी, मालकीचा तपशील, क्षेत्रफळ, आणि फेरफार यांसारखी माहिती सुद्धा मिळेल.
- आणि जर का काही कागदपत्र शासनाच्या पोर्टलवर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला ती सरकारी कार्यालयातून मिळवावी लागेल.
काही महत्त्वाच्या सूचना
- माहिती भरताना अचूक माहिती भरा, कारण की कोणत्याही कागदपत्रांचा शोध घेताना जमिनीचा सर्वे नंबर अथवा गट क्रमांक अचूक भरल्याशिवाय त्याचे कागदपत्रे मिळणार नाहीत.
- डाउनलोड केलेली कागदपत्रे सुरक्षित सेव करा किंवा प्रिंट काढून घ्या. (Old Land Records free Download)
- पासवर्ड गोपनीय ठेवा, कारण तुमच्या खात्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तुम्ही निवडलेला पासवर्ड इतर कोणाशीही शेअर करू नका.
Old Land Records free Download करण्याचे फायदे
- वेळ आणि पैसा वाचतो सरकारी कार्यालयात जाण्याची गरज उरत नाही, त्यामुळे वेळ आणि खर्च वाचतो.
- गहाळ कागदपत्रांचा धोका नाही डिजिटल स्वरूपातील कागदपत्रांमुळे त्यांचे नुकसान किंवा गहाळ होण्याचा धोका टळतो.
- पारदर्शकता कागदपत्रे थेट पोर्टलवरून मिळाल्याने बनावट कागदपत्रांची शक्यता कमी होते.
- घरबसल्या पाहण्याची सुविधा मोबाईल किंवा संगणकावरून कोठूनही कागदपत्रे पाहता येतात.
निष्कर्ष काय?
कोणत्याही जमिनीची अतिशय जुनी कागदपत्रे शोधण्यासाठी/डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विकसित केलेली ही ऑनलाईन प्रणाली शेतकरी, जमीनमालक, आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
सरकारच्या या सुधारित प्रणालीमुळे तुमचा वेळ, पैसा, आणि श्रम वाचून कागदपत्रांचा सुरक्षित आणि सोपा प्रकारे पुरावा मिळतो.
तुमच्या किंवा इतर कोणाच्याही जमिनीच्या संबंधित माहिती शोधण्यासाठी किंवा त्यांचे जुने कागदपत्रे पाहण्या/ डाऊनलोड करण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्या.