घरबसल्या काढा तुमचे रेशन कार्ड; रेशन कार्ड संबंधित सर्व माहिती मिळेल एकाच ॲपवर : Online Ration Card Apply 2024

Online Ration Card Apply 2024 : भारतातील प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचे एक महत्त्वाचे दस्तावेज म्हणजे राशन कार्ड हे होय. काही वेळा रेशन कार्ड मध्ये छोटे-मोठे बदल करायचे असतात. जसे की, मृत व्यक्तीचे नाव कमी करणे, नवीन जन्म झालेल्या बाळांचे नाव समाविष्ट करणे, पत्ता बदलणे, किंवा नवीन रेशन कार्ड काढणे यासाठी सर्वसामान्य माणसांना सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात.

पण आता रेशन कार्ड संबंधित सर्व कामे जसे की नवीन रेशन कार्ड काढणे पत्त्यामध्ये अपडेट करणे किंवा इतर कोणतेही काम असो यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या चकरा मारण्याची काहीच गरज नाही. कारण घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरच “मेरा राशन” या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ही सर्व कामे अवघ्या पाच मिनिटात करू शकतात. आणि यासाठी तुम्हाला एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.

  • Manager Family Details : तुम्ही रेशन कार्डमधील कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरू शकता. जसे की, नवीन नाव समाविष्ट करणे किंवा जुने नाव कमी करणे.
  • Ration Entitlement : या सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या परिवारातील सदस्यानुसार किती रेशन दिले जाते याची माहिती मिळेल.
  • Track my Ration : या सुविधेमुळे तुम्ही अर्ज केलेले रेशनकार्ड तुमच्या डीलरपर्यंत पोहोचले आहे की नाही याची माहिती मिळेल.
  • My Grievance : या सुविधेमुळे रेशन कार्ड संबंधित संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी तुम्ही या पर्यायाचा वापर करू शकतात
  • Sale Reciept : रेशन दुकानातून धान् घेतल्यावर जर दुकानदाराने तुम्हाला पावती मिळाली नसेल, तर तुम्ही ती ऑनलाइन डाउनलोड करून घेऊ शकता.
  • Benefits Received From Government : या सुविधेमुळे रेशन कार्डधारकांना रेशन कार्डवर दिल्या जाणाऱ्या इतर लाभांची माहिती मिळेल.
  • Near by FPS Shops : या सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन दुकानदाराची माहिती मिळेल.
  • Surrender Ration Card : या सुविधेमुळे तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमचे रेशन कार्ड बंद करता येईल.
  • Ration Card Transfer : या सुविधेचा वापर करून तुम्ही तुमचे रेशन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर हस्तांतरित करू शकता.

मेरा राशन ॲपवर माहिती बघण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे? (How To Apply For Online Ration Card)

  • हे ॲप वापरण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील Google pay Store वर Mera Ration 2.0 सर्च करा
  • आता तुमच्यासमोर Mera Ration 2.0 हे ॲप दिसेल, हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या
  • Mera Ration 2.0 ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून त्याने मागितलेली सर्व परमिशन द्या
  • आता Mera Ration 2.0 या ॲपवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा दिसतील. तुम्हाला ज्या सुविधेचा वापर करायचा आहे त्यावर क्लिक करून विचारलेली माहिती नमूद करा.
  • माहिती व्यवस्थित आणि योग्यरीत्या नमूद केल्यावर सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती दिली जाईल.

Online Ration Card Apply साठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  • ओळखपत्र : जसे की- पॅन कार्ड, मतदानकार्ड, पासपोर्ट
  • रहिवासी प्रमाणपत्र : जसे की – वीजबिल, टेलिफोन बिल, व्होटर आयटी, पासपोर्ट
  • कुटुंबाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • स्वघोषणापत्र
  • चौकशी अहवाल
Scroll to Top