Jamin Mojani 2024 | आजच्या काळात जमीन (Land) हा अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा मुद्दा आहे. जमिनीवरून खूप वाद झाले असून बरीच प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे शेतकरी Land Measurement Application अर्थातच जमीन मोजणीला प्राधान्य देत आहे. जमीन मोजणी मुळेच आपली जमीन कुठपासून कुठपर्यंत हे समजण्यास मदत होते. आणि त्यासाठी आजच्या या लेखात आपण जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा, जमीन मोजणीसाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि शुल्क किती आहे याची माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळेच हा लेख शेवटपर्यंत वाचा..
असा भरावा जमीन मोजणीसाठी (Jamin Mojani) ऑनलाइन अर्ज
- सर्वप्रथम अर्जाचा नमुना भारत सरकारच्या https://emojni.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून तुम्ही ते डाऊनलोड करावा.
- या अर्जावर जमीन मोजणीसाठी अर्ज असं ठळक आणि स्पष्ट अक्षरात लिहिलेलं आहे.
- यानंतर तुमचा तालुक्याचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव नमूद करावे.
- त्यानंतर खाली दिलेल्या रकान्यात तुमचे संपूर्ण नाव, गावाचे नाव ते सुद्धा पिनकोडसहित आणि तुमचा आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा.
- त्यानंतर खाली असलेल्या रकान्यामध्ये जमीन मोजणी करण्यासंबंधीची संपूर्ण माहिती, जमीन मोजणीचा प्रकार, गावाचे नाव, वार्डाचे नाव आणि शेतीचा गट नंबर योग्यरित्या नमूद करणे अत्यंतआवश्यक आहे.
- त्यानंतर जमीन मोजणी फीची रक्कम नमूद करून चलन पावतीचा नंबर प्रविष्ट करावा.
- याशिवाय जमिनीच्या ७/१२ उताऱ्याप्रमाणे सहधारक जमीन मालकाची नावे टाकावीत.
- त्यानंतर सदरील अर्जामध्ये जमिनीलगतचे कब्जेदार, त्यांचे संपूर्ण नाव, त्यांची जमीन आपले जमिनीच्या कोणत्या बाजूस जसे की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आहे याची माहिती स्पष्टपणे नोंदवावी.
- अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांचे तपशील जसे की मोजणी फीचे चलन, तीन महिन्याची मिळकत पत्रिका, तीन महिन्याच्या आतील ७/१२ उतारा जोडावा
- अर्जाच्या शेवटी जमीन मोजणीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा सही किंवा अंगठा द्यावा.
याशिवाय शेत जमिनीच्या मोजणीसाठी तुम्ही तुमच्या तहसीलदार अथवा तालुका कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. या अर्जाचा नमुना भारत सरकारच्या https://emojni.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटवर उपलब्ध असून इथूनही डाउनलोड करता येईल